Join us  

Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीचं दोघांनी सजवलेलं सुंदर घर, हा VIDEO पाहून तुम्ही प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 3:05 PM

Siddharth Chandekar, Mitali Mayekar : सिद्धार्थने त्यांच्या नव्या घराची एक खास झलक दाखवणारा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही या घराच्या प्रेमात पडाल.

Siddharth Chandekar, Mitali Mayekar New Home in Mumbai : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे मिताली मयेकर  आणि सिद्धार्थ चांदेकर. अनेकदा हे कपल त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्यातल्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतं. 2021 मध्ये सिद्धार्थ-मितालीने मोठ्या दणक्यात लग्न केलं. त्यानंतर अवघ्या वर्षभरानंतर या जोडीने त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. सिद्धार्थ व मितालीचं हे नवं घर दृष्ट लागावी इतकं सुंदर आहे. होय, सिद्धार्थने त्यांच्या नव्या घराची एक खास झलक दाखवणारा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. सिद्धार्थ व मितालीनं आपलं घरं सुंदररित्या सजवलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्या या घराच्या प्रेमात पडाल.

घरातील प्रत्येक गोष्ट लक्षवेधून घेणारी आहे. घराच्या खिडकीतून दूरवर पसरलेली मुंबई दिसते. यानंतर लक्ष वेधून घेतात, ते सुंदर फोटो. घराच्या एका कोपºयात टांगलेलं झुंबर, कुंडीतलं छोटं रोपटं, दाराबाहेरची चांदेकर आडनावाची पाटी सगळंच युनिक़ सिद्धार्थ आणि मितालीनं दोघांनी मिळून हे घर सजवलेलं आहे. साहजिकच घरातल्या प्रत्येक वस्तूसोबत त्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.

चाहत्यांना सिड व मितालीचं हे घर भलतंच आवडलं आहे. सिद्धार्थने  घराचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. घर कमालीचं सुंदर सजवल्याबद्दल दोघांचंही कौतुक होतंय. सिद्धार्थ आणि मिताली यांनी जानेवारी 2021 ला पुण्यातील ढेपेवाडा येथे शाही थाटात  लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही तुफान व्हायरल झाले होते. 

‘हमने जिना सीख लिया’ या हिंदी सिनेमाद्वारे 2007 मध्ये सिद्धार्थ प्रेक्षकांसमोर आला. 2010मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिलं पाऊल टाकलं. ‘क्लासमेट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,आॅनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार, झिम्मा या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तर मितालीने ‘उर्फी’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले. लाडाची मी लेक गं या मालिकेतही तिने काम केलं.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरमराठी