Join us  

 संपलास तू....! सिद्धार्थने शेअर केला झोपलेल्या मितालीचा व्हिडीओ, पाहून हसू आवरणार नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 1:56 PM

Siddharth Chandekar Mitali Mayekar : होय, सिद्धार्थने बायको मिताली मयेकरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा मजेशीर व्हिडीओ पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेटी बॉय सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर धम्माल पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या खट्याळ पोस्ट चाहत्यांना आवडतात. सध्या सिद्धार्थने अशीच एक खट्याळ व मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. होय, सिद्धार्थने बायको मिताली मयेकरसोबतचा (Mitali Mayekar) एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा मजेशीर व्हिडीओ पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये मिताली व सिद्धार्थ दोघंही एक लक्झरी बसमधून प्रवास करताना दिसत आहे. प्रवासात मिताली मस्तपैकी झोप काढते आहे आणि सिद्धार्थने त्यावर नवं रील तयार केलं आहे. या ‘आमचं पहिलं वहिलं ड्यएट गाणं... माझ्या मते, माझ्या बायकोने उत्तम कामगिरी केली आहे,’ असं कॅप्शन देत सिद्धार्थने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थ व मितालीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मितालीची अशी फजिती करणाऱ्या या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. संपलास तू..., अशी कमेंट गायिका जुईली जोगळेकर हिने केली आहे. हा..हा..हा... सो क्यूट, अशी कमेंट अमृता खानविलकरने केली आहे. हा..हा..हा...बिचारी, अशी कमेंट अभिजीत खांडकेकरने केली आहे. खरा ओपेरा ती उठल्यावर होईल, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका चाहत्याने केली आहे. डिनर नाही भेटणार ना आता तुला, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी इंडस्ट्रीतलं क्युट कपल आहे. चाहत्यांचं हे लाडकं कपल एकमेकांवर प्रचंड प्रेम करतं. दोघं अनेकदा एकमेकांची मस्करी करतात, टिंगल करणारे व्हिडीओ शेअर करतात. पण दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.  सिद्धार्थ जितकी मितालीची टिंगल करतो तितकंच प्रेम करतो आणि तिला सपोर्ट करतो हे अनेकदा दिसून आलं आहे. सध्या चाहते या व्हिडिओची मजा लुटताना दिसत आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर