Join us  

"अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले" सुबोध भावेने शेअर केली पोस्ट; मोदींचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 11:42 AM

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

Subodh Bhave : मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने काल घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा होताच केंद्र सरकारच्या या निर्णयाचं जगभरातील मराठी भाषिक जनतेने स्वागत केलं आहे. त्यावर राजकीय, सामाजिक तसेच कलाविश्वातील मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेताच अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

सुबोध भावेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहलंय, "अभिजात भाषा, मराठी भाषा! केंद्र सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले त्या प्रत्येकाला मनापासून वंदन! 

मराठी भाषेला 'अभिजात' भाषेचा दर्जा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह बंगाली, प्राकृत, आसामी या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर पूर्ण केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे.

टॅग्स :सुबोध भावे नरेंद्र मोदीमराठी अभिनेतासेलिब्रिटी