Join us

"हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जातोय...", सुमीत राघवन यांनी ट्विट करत व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 5:15 PM

Sumeet Raghavan :''जिथे पिकतं तिथे विकत नाही'', अशा शब्दांत मराठी सिनेमांना थिएटर मिळात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेता सुमीत राघवन ( Sumeet Raghvan ) हा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय मुद्यांवर तो परखड मत मांडत असतो. सध्या सुमीतची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षा बंधन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचा परिणाम सुमीत राघवन याचा अलीकडेच  रिलीज झालेला सिनेमा 'एकदा काय झालं'ला थिएटर मिळत नाहीय. त्यामुळे त्याने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

''काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्ट मध्ये एक वाक्य लिहिलं होतं की "जिथे पिकतं तिथे विकत नाही". आज एक आठवडा झाला #EkdaKaayZala प्रदर्शित होऊन आणि मुंबईत जेमतेम ३ shows आहेत,एक ठाण्याला आहे,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाहीये. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय.'' असं ट्वीट सुमीत राघव याने ट्विटरवर केलं आहे. सध्या त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

 सुमीत प्रमाणेच संगीतकार सलील कुलकर्णी आणि अमेय खोपकर यांनी देखील मराठी सिनेमांना लाँग विकेंडला थिएटर मिळत नसल्याने प्रश्न उपस्थित केला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) या दोन बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देत असताना दुसरीकडे मराठी सिनेमांचे शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी हिंदीवाल्यांची मुजोरी त्वरित थांबली पाहिजे, असा इशारादेखील दिला आहे. 

टॅग्स :सुमीत राघवनसलील कुलकर्णी