Join us

"मला नेहमी असं वाटायचे की..", मेट्रो कारशेडवरून सुमीत राघवनचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:52 PM

सुमीत राघवनचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय आहे. यात त्यांनी अश्विनी भिडे यांचं अभिनंदन केलंय.

अभिनेता सुमीत राघवन ( Sumeet Raghvan ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय मुद्यांवर तो त्याचे परखड मत मांडत असतो. आता पर्यंत त्याने आरे मेट्रो प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर निशाणा अनेकवेळा साधला आहे. ‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. सुमीत राघवनने काही दिवसांपूर्वी ‘कारशेड वही बनेगा’ म्हणत ट्विट केले होते. यासगळ्यात आता त्याने पुन्हा एकदा ट्विट केले आहे, जे चर्चेत आले आहे.

सुमीत राघवन अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजु झाल्या म्हणून अभिनंदन करणार ट्विट केलंय. यासंदर्भात लिहिताना सुमीतने ट्विट केलं, अब आएगा मजा, मला नेहमी असं वाटायचे की हा प्रोजेक्ट पूर्ण होताना तुम्ही तिथे असायला हव्यात आणि तुम्ही तिथेच आहात.  यासोबत सुमीतनं #KarmaStrikesBack #CarShedWahiBanega हे हॅशटॅग वापरले आहेत. सुमीतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय आहे.

सुमीत राघवन हा मूळचा मुंबईचा असून तो एक वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. सुमितने आपल्या करिअरची सुरुवात 1983 पासून केली. सुमितचे बाबा तमिळ आणि आई कानडी होती. अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि तो मोठा झाला. लहानपणापासूनच त्याला गाण्याची आवड होती. त्याने पंडित वसंतराव कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांच्याकडे गायनाचा प्रशिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षी सुमितने स्टेजवर परफॉर्म करायला सुरुवात केली. 

 

टॅग्स :सुमीत राघवनसेलिब्रिटी