Join us

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याची उत्तम पटकथा, स्वप्नील जोशी ट्वीट करत म्हणाला, 'आर्ट...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 10:08 AM

राजकीय नाट्य की सिनेमाची कथा

सध्याचं महाराष्ट्राचंराजकारण म्हणजे कोणत्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अनेक ट्विस्ट अँड टर्न्ससह राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. याचे सर्वच साक्षीदार आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. अजित पवारांनी विरोधी पक्षतेनेपदाचा राजीनामा देत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनेही (Swapnil Joshi) एक ट्वीट केलंय जे आता चर्चेत आहे.

स्वप्नील जोशीने ट्वीट करत लिहिले, 'एक उत्तम पटकथा लिहिण्याची कला. ' म्हणजेच काय तर सध्याचं राजकीय नाट्य हे एखाद्या पटकथेपेक्षा कमी नाही. यावर एखादा सिनेमाच होऊ शकतो अशी प्रतिक्रिया उमटत आहे. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना तर एखादा चित्रपट बनवण्यासाठी मिर्च मसालाच मिळालाय. पण दुसरीकडे मतदारांची काही किंमतच राहिली नसल्याचं चित्र दिसतंय. महाराष्ट्राने इतकं गलिच्छ राजकारण कधीच बघितलं नव्हतं अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मराठी कलाकारही या राजकारणावर आपली मतं मांडत आहेत. सुबोध भावे, तेजस्विनी पंडित यांनीही सोशल मीडियावर मत मांडलं आहे.

दरम्यान काल अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :स्वप्निल जोशीमहाराष्ट्रराजकारणमराठी अभिनेता