Join us

"शब्द सुचत नाहीत...मला पांडुरंग असा भेटला", स्वप्निल जोशीची पोस्ट चर्चेत !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 2:07 PM

अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला.

सर्वसामान्यापासून ते कलाकारापर्यंत प्रत्येकाला विठुरायच्या दर्शनाची ओढ लागली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी चालत पंढपुरात दाखल होत आहेत. टाळ-मृदूंगाच्या गजरात प्रत्येक वारकरी न्हाऊन निघाला आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला. 

वारीचा हा प्रवास" प्रत्येकाने एकदा तरी करावाच.."तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !" असे माझी आजी म्हणायची. ती असे का म्हणायची त्याची अनुभूती मला काल झाली. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही अशा शब्दात स्वप्नीलने आपला अनुभव कथन केला. स्वप्नील म्हणाला की, आम्ही पिक्चरमधील हिरो असलो तरी खरे हिरो हे वारकरीच.  वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पायी वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटले.

स्वप्निलने सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले आहेत. मला पांडुरंग असा भेटला ! जय हरी विठ्ठल ! काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो ! अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली ! कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे ! बघू, पांडुरंग कधी संधी देतो ! पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही ! आम्ही picture मधले hero ! पण खरे हिरो हे वारकरी ! वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पाई वारी चालतात ! पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते ! त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं ! @1OTTofficial @narendrafirodia सर आणि आमच्या टीमने वारी मध्ये जे काम केलं आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, lost and found stalls असतील, ते पाहून खूप आनंद झाला ! मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा अभिमान आहे ! लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत ! हा "प्रवास" प्रत्येकाने एकदा तरी करावाच ! माझी आजी म्हणायची..."तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !" काल मला कळलं ती काय म्हणायची ! जय हरी विठ्ठल ! अशी पोस्ट स्वप्निलने लिहिली आहे. 

टॅग्स :स्वप्निल जोशीपंढरपूर