Join us

मराठमोळा अभिनेता उमेश कामतची पोस्ट आली चर्चेत, म्हणाला- बायकोचे फोटो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:26 IST

उमेश कामतने शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची जास्त चर्चा होतेय.

मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

उमेश कामतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात उमेश कामतने शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची जास्त चर्चा होतेय. उमेशने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत, 'फॉलोईंग बायकोचे फोटो स्टेप्स' असं कॅप्शन दिलंय. यावर प्रिया बापटने Photo मीच काढलाय कामत अशी कमेंट केलीय. आ हा खूपच छान जुग जुग जुग जुग जियो, बापट आणि कामत😂 भारीय, एकदम कडक अशा कमेंट्स चाहत्यांनी उमेशच्या या फोटोवर केल्यात. 

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होकार दिला.

उमेशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल तर, ‘आणखी काय हवं’ वेबसीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता. यानंतर उमेश सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसला. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट