Join us

'उपेंद्र लिमये सोशल मीडियावर का नाही?' अभिनेत्याने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:24 IST

Upendra limaye: जवळपास ७ ते ८ वर्षामध्ये पहिल्यांदाच उपेंद्रने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor)  याचा Animal  हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे. या सिनेमात अनिल कपूर, रश्मिका मंदाना यांच्यासोबतच मराठी अभिनेता उपेंद्र लिमयेदेखील (Upendra Limaye)   झळकला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात उपेंद्रने छोटेखानी पण तितकीच ताकदीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या नावाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. उपेंद्र कलाविश्वात चांगलाच सक्रीय आहे. मात्र, सोशल मीडियावर तो अजिबात अॅक्टीव्ह नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तो नेमका सक्रीय का नाही यामागचं कारण त्याने नुकतंच लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत दिलं आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेल्या उपेंद्र लिमये सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. त्यामुळे २०१४ नंतर त्याने थेट अलिकडेच म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये एक पोस्ट शेअर केली. त्यामुळे उपेंद्र सोशल मीडियावर सक्रीय का नसतो?  त्यामागचं कारण काय? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. यामागचं कारण त्याने सांगितलं आहे.

या कारणामुळे सोशल मीडियापासून उपेंद्र राहतो लांब

"काय झालंय सोशल मीडिया आलंय आपल्याकडे पण कशाप्रकारे ते सेंसेबली हाताळावं याचे कोणतेच संस्कार झालेले नाहीत. त्यामुळे असं होतं की सकारात्मक गोष्टी घडण्यापेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त घडतात. म्हणूनच मग त्या वाट्याला आपण जायला नको असं वाटतं. ज्या पद्धतीने ट्रोलिंग होतं. मुळात विकृती इतकी आहे त्या विकृतीला काही लिमीट नाही. आणि ,त्या माणसांना ती विकृती मांडायची आहे. मग आपण कशाला तो त्रास सहन करा, " असं उपेंद्र म्हणतो.

पुढे तो म्हणतो, "काहीही कारण नसताना एक ती निगेटिव्हीटी तुमच्या डोक्यात जाते आणि तुम्ही डिस्टर्ब होता ती निगेटिव्हिटी जनरेट होऊ नये यासाठीच मी सोशल मीडियापासून लांब असतो." दरम्यान, उपेंद्र लिमयेने २०१४ मध्ये सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास ७ ते ८ वर्ष तो यापासून लांब होता. मात्र, Animal  रिलीज झाल्यानंतर त्याने इतक्या वर्षांनी पहिली पोस्ट केली. 

टॅग्स :उपेंद्र लिमये रणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीमराठी अभिनेता