मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात. यामध्येच सध्या अभिनेता वैभव तत्ववादीची (vaibhav tatwawadi) चर्चा रंगली आहे. मराठीसह बॉलिवूडमध्ये झळकलेला वैभव मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे. वैभवचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींसोबत त्याचं छान नातं निर्माण झालं आहे. यामध्येच सध्या वैभव अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behere) आणि पूजा सावंतमुळे (pooja sawant) चर्चेत येत आहे.
पूजा आणि प्रार्थना या दोघीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या दोन्ही अभिनेत्रींनी कलाविश्वात त्यांचं भक्कम असं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा रंगत असते. यात सध्या वैभव तत्ववादी आणि या दोन्ही अभिनेत्रींचं खास नातं असल्याचं समोर आलं आहे.वैभव, पूजा आणि प्रार्थना हे तिघं एकमेकांचे बेस्टफ्रेंड आहेत. त्यांची मैत्री अत्यंत खोलवर रुजली आहे. त्यामुळे या तिघांची मराठी कलाविश्वातही कायम चर्चा रंगत असते. वैभवने या दोन्ही अभिनेत्रींसोबत अनेक सिनेमांमध्येही एकत्र काम केलं आहे.
'वैवाहिक जीवनात...'; अखेर लग्नाविषयी वैभव तत्ववादीने सोडलं मौन
दरम्यान, वैभवची मुख्य भूमिका असलेला सर्किट हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या वैभव चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. वैभवने आजवरच्या कारकिर्दीत 'फक्त लढ म्हणा', 'कुरुक्षेत्र', 'हंट', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'बाजीराव मस्तानी' अशा कितीतरी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.