Join us

शरद पवारांची भूमिका साकारायचीय मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:02 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने आतापर्यंत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने आतापर्यंत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. पण, त्याने लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांच्या बायोपिकमधून प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. नुकतेच सुबोध भावेने त्याला शरद पवार यांच्या जीवन प्रवासावर आधारीत चित्रपटात काम करायला आवडेल, असे सांगितले. 

नुकतेच सुबोध भावेने आता त्याला शरद पवारांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, असे एका मुलाखतीत सांगितले आणि म्हणाला की, मनात काय चालले आहे ते तुम्हाला काहीच कळू द्यायचे नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढे बघितले तेवढे आज राजकारणात कोणीच पाहिलेले नाही. मी चेष्टा म्हणून म्हणत नाही, पण सतत सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल.

सुबोध भावे सध्या झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारीत असून या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याने यात निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. या शिवाय सुबोध 'एबी आणि सीडी' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. सुबोध भावे याने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. 

डिजिटल मीडियावर नेहमीच नवनवीन उपक्रम घेऊन येणाऱ्या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :शरद पवारसुबोध भावे अमिताभ बच्चनविक्रम गोखले