सदाबहार अभिनेत्री म्हटलं की, बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा चेहरा डोळ्यांपुढे येतो आणि मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री आठवायचं म्हटलं की, एकाच अभिनेत्रीची आठवण होते. ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ऐश्वर्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत. आजही त्या तितक्याच फिट दिसतात.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यांनी सोशल मीडियावर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. शॉर्ट्समधले त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोमागची स्टोरी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. Lokmat Filmyला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या या फोटोंवर बोलल्या...
मी शॉर्ट्समधले फोटो टाकले, तेव्हा..मी जेव्हा आता शॉर्ट्समधले फोटो टाकले, तेव्हा...एकतर मी कधीच शॉर्ट्स वापरली नव्हती. मला आठवते, मी कॉलेजमध्ये असताना कधी जीन्सपण घातली नव्हती. स्लिव्हलेस ब्लाऊज मी आत्ता आत्ता कुठे वापरायला लागले. मी आता सगळं का करतेय? लोकांना मला काही दाखवून द्यायचंय आहे का किंवा मी तसा विचार करू लागलेय का? तर असं काहीही नाहीये. माझ्या मते, ज्या कॉस्च्युममध्ये तुम्ही कम्फर्टेबल असता, ते कॅरी करायला काहीही हरकत नाहीये. जोपर्यंत मी कम्फर्टेबल नव्हते तोपर्यंत साडी आणि चुडीदार पलीकडे मी काहीही घातलेलं नाही. पण आता मला कम्फर्टेबल वाटतं तर मी घालते. सोशल मीडियावर यावरून टीकाही होते. म्हातारपणी तुम्हाला हे काय सुचतंय, असं लोक म्हणतात. पण मला वाटतंय, कम्फर्टेबल असाल तर लोकांचं देणघेणं नाही, असं त्या म्हणाल्या.मी फिट आहे. मी फिटनेस जपतेय. फिजिकली फिट झाल्यावर मला छान वाटतं हे सगळं केल्यावर. मी खूप काही आक्षेपार्ह करतेय, असं मला वाटत नाही. त्यामुळे मला मजा येते, असं त्या म्हणाल्या.
ऐश्वर्या या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आलेल्या ऐश्वर्या यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या कायम संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. ऐश्वर्या यांनी अपराध , धड़क, अंकगणित अशा अनेक या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच श्रीमंता घरची सून, दुहेरी, रेशीमगाठी, सोनपावले, या सुखांनो या, स्वामिनी, ये प्यार ना होगा कम, घर की लक्ष्मी बेटीयाँ अशा असंख्य मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.