मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (amruta subhash). दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगत असते. अमृताला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. अमृताची आई ज्योती सुभाषदेखील मराठी अन् हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अमृता उत्तम अभिनयासह तिच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येते असते. परंतु, सध्या अमृता तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.
अमृताने संदेश कुलकर्णी यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं असून त्यांची लव्हस्टोरी भन्नाट आहे. इतकंच नाही तर या जोडीने करिअरला प्राधान्य देत मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अमृताची पर्सनल लाइफ चर्चेत येत आहे.
अशी आहे अमृता-संदेशची लव्हस्टोरी
संदेश कुलकर्णी हा लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा सख्खा भाऊ आहे. विशेष म्हणजे सोनाली आणि अमृता या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्री त्यामुळे या दोघींचही एकमेकींच्या घरी येणं-जाणं होतं. यामध्येच सोनालीच्या घरी जाणारी अमृता संदेशच्या प्रेमात पडली. सोनालीचा वाढदिवस असल्यामुळे एका अमृता तिच्या घरी शुभेच्छा द्यायला गेली होती. त्यावेळी संदेश घरातच होता. त्यावेळी अमृताने संदेशला पाहिलं आणि त्याचक्षणी त्याच्या प्रेमात पडली.
मूल न होण्याचा घेतला निर्णय
काही वर्षांपूर्वी अमृताने 'आपलं महानगर'ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने मूल होऊ न देण्याविषयी भाष्य केलं. "आताचा काळ बदलत चालला आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण स्वत:चं मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यापैकीच आम्ही एक आहोत. मुल आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आमच्या करिअरमध्ये खूप बिझी आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्हाला बाळ नकोय. आमचं आमच्या कामावर खूप प्रेम आहे आणि ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमचासारखा विचार करणारेही अनेक जण आहेत. परंतु, मग आम्हाला मुलं आवडत नाही असा याचा अर्थ अजिबात नाही", असं अमृता म्हणाली.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये अमृताने सिनेमात इंटिमेट सीन देण्याविषयीदेखील भाष्य केलं. पहिल्या सिनेमामध्ये इंटिमेट सीन देण्यापूर्वी तिने पती संदेश याला फोन केला होता. मात्र, त्याने तिला पूर्ण पाठिंबा दिला.‘लाजू नकोस. पडद्यावर लाजून जे काही करशील ते वाईट दिसेल. खरं केलंस तरच छान दिसणार, अवघडलीस तर ते वाईटच दिसेल. ही एक भावना आहे. रडायचा सीन नीट करतेस ना. मग या भावनेला वेगळं का ट्रिट करायचं. ते प्रेम आहे,’ असं म्हणत संदेशने तिची समजूत काढली होती. त्यानंतर अमृताने 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये इंटिमेट सीन दिला होता, असंही तिने सांगितलं.