Join us

वयाच्या ७५ व्या वर्षीही ज्योती सुभाष यांचा सळसळता उत्साह कायम; अमृताने शेअर केला आईचा हटके डान्स व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:19 IST

Amruta subhash: अमृता सुभाषची आईदेखील तिच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (amruta subhash). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अमृताने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे आज मराठीसह अन्य भाषिक प्रेक्षक सुद्धा तिचे चाहते आहेत. विशेष म्हणजे अमृताला हा अभिनयाचा वारसा तिच्या आईकडून मिळाला आहे. त्यामुळेच आईच्या वाढदिवशी तिने एक खास पोस्ट शेअर करत आईचे आभार मानले आहेत.

अमृता सुभाषची आईदेखील तिच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. अमृताच्या आईचं नाव ज्योती सुभाष असं असून आजही त्या कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे वयाची ७५ वर्ष पार केल्यानंतरही त्यांच्यातील सळसळता उत्साह कायम आहे. त्यामुळेच अमृताने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

"आई काल ७५ वर्षांची झाली. तिनं मला आयुष्यात ज्या लाखमोलाच्या भेटी दिल्यात त्या सगळ्या या व्हीडीओत दिसतात. सुंदर गाणं, नाच, अभिनय आणि अचूकतेची आस.. आपल्या कलेतून आयुष्यावर भरभरुन प्रेम करणं.. मी ऋणी आहे. आई तू एक आनंदाचा धबधबा आहेस! खूप प्रेम", असं कॅप्शन अमृताने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये ज्योती सुभाष या एक डान्स स्टेप शिकवताना दिसत आहेत.

दरम्यान, ज्योती सुभाष या मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका गाजली आहे. त्यामुळे आज त्यांचा कलाविश्वात दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमा