Join us

'मराठी भाषा दिना'लाच अमृताच्या घरी अवतरले दोन दिग्गज, शुभदिनी भेटीचा योग आला जुळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 18:14 IST

मराठी भाषा दिनानिमित्त अमृता सुभाषची पोस्ट

आज मराठी भाषा दिवस निमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आजचा दिवस साजरा करत आहे. मराठी तसंच हिंदी इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री अमृता सुभाषही (Amruta Subhash) तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. मराठी भाषादिनानिमित्त तिने दोन दिग्गजांची भेट घेतली. त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शनही लिहिलं आहे. आजच्याच दिवशी नक्की कोणाला भेटून अमृताला इतका आनंद झाला बघा

अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे.यामध्ये तिने दोन दिग्गज व्यक्तींसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.  पटकथा लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे आणि राजहंस प्रकाशन संस्थेचा स्थापना करणारे दिलीप माजगावकर यांच्यासोबत भेटीचा योग जुळून आल्याचं अमृताने म्हटलं आहे. अमृताने लिहिले, "आज मराठी भाषा दिन! मराठीतले दोन दिग्गज घरी अवतरले आज! मा. सई परांजपे आणि मा. दिलीप माजगावकर! माजगावकरांविषयी बोलावे तेवढे थोडेच.त्यांच्या राजहंस प्रकाशनाने मराठीत कितीतरी दर्जेदार पुस्तके काढली."

ती पुढे लिहिते, "आज मराठी भाषा दिनाच्या दिवशीच त्यांना भेटायचा योग यावा हा अपूर्व योगायोग आहे! सई मावशी बरोबर मी आणि संदेशनं मिळून ‘गुलाबी’ नावाचा लघुपट केला होता अनेक वर्षांपूर्वी. तो आज पुन्हा पाहीला. तिचे सिनेमे, नाटकं याविषयी भरपूर गप्पा झाल्या.ती किती कमाल फिल्ममेकर आहे! या दोघांशी गप्पा मारुन फार आनंद झाला."

अमृताला आजच्या दिवशी लाभलेली ही भेट किती भाग्याची आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी तिच्या पोस्टवर दिल्या आहेत. अमृतासोबत यावेळी तिचा नवरा संदेश कुलकर्णीही होता. चौघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

टॅग्स :अमृता सुभाषमराठी अभिनेतामराठी भाषा दिनसोशल मीडिया