Join us

प्रथमेश परबचे आईवडील दिसताच मराठी अभिनेत्रीने केला वाकून नमस्कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:51 IST

मराठी अभिनेत्री पडली प्रथमेश परबच्या आईवडिलांच्या पाया; व्हिडिओ व्हायरल

प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मुख्य भूमिकेत असलेला 'डिलिव्हरी बॉय' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री अंकिता लांडेपाटील मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. सरोगसीसारख्या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे. नुकतंच या सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. 'डिलिव्हरी बॉय'च्या प्रिमियरला सिनेमातील कलाकारांनी कुटुंबीयांसह हजेरी लावली होती. 

'डिलिव्हरी बॉय' सिनेमाच्या प्रिमियर सोहळ्याला प्रथमेश परबबरोबर त्याचे आईवडील, भाऊदेखील उपस्थित होता. तर पृथ्वीक त्याच्या आईला घेऊन हजर होता. या ग्रँड प्रिमियरमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रथमेश त्याच्या कुटुंबीयांबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. तेवढ्यात तिथे अभिनेत्री अंकिता लांडेपाटील येते. प्रथमेशच्या आईवडिलांना पाहताच अंकिता त्यांना वाकून नमस्कार करत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून अभिनेत्रीच्या या वागण्याचं कौतुकही होत आहे. दरम्यान, 'डिलिव्हरी बॉय' हा सिनेमा ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मोहसीन खान यांनी केलं आहे. या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 

टॅग्स :प्रथमेश परबसेलिब्रिटीमराठी चित्रपट