Join us

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना जिथे कैद करून ठेवलं, तिथे पोहोचली मराठी अभिनेत्री, म्हणते- "तो वाडा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:05 IST

औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला मराठी अभिनेत्रीने भेट दिली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास मांडणारा छावा सिनेमा संपूर्ण जगभरात गाजत आहे. या सिनेमात संभाजी महाराजांवर औरंगजेबाकडून किती क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले ते पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला मराठी अभिनेत्रीने भेट दिली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. 

अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने कुटुंबीयांसोबत संगमेश्वर येथील कसबा गाठलं. ज्या वाड्यात संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं. त्या ठिकाणाला अभिनेत्रीने भेट दिली. त्यानंतर तिला आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. "संगमेश्वर कसबा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले …ही वास्तू नेमकी काय आहे आणि ती वास्तू पाहून मन खिन्न झाले. चांगले नाही वाटले. कदाचित म्हणूनच त्या वास्तूमध्ये खूपच भयाण सत्य लपलेलं आहे. तो वाडा दुःखी दिसतो. मी माझ्या मुलासोबत अश्या बऱ्याच ठिकाणी जात असते जिथे आपला इतिहास,आपली संस्कृती त्याला समजली पाहिजे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, "प्रत्येक आई जिजाबाई नाही होऊ शकत. प्रत्येक घरात शिवाजी नाही जन्म घेऊ शकत. पण प्रत्येक घरात जिजाईचे संस्कार आणि हिंदुत्वाविषयी प्रेम प्रत्येक आई देऊच शकते. एक चांगला माणूस चांगला नागरिक आणि चांगला भारतीय घरातूनच घडतो आणि घडवला पाहिजे. त्यासाठी पैशाची नाही तर मनाची तयारी लागते. मी माझ्या मुलाला नेहमी एकच गोष्ट शिकवते चांगला माणूस हो ..आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण छान जग".  

टॅग्स :छत्रपती संभाजी महाराज'छावा' चित्रपटसेलिब्रिटी