Join us

अजूनही यौवनात मी! अश्विनी भावेंनी शेअर केलेला फोटो चर्चेत; सेलिब्रिटी करतायेत कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:50 IST

Ashvini Bhave: अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अश्विनी यांनी त्यांच्या फिटनेसवर कमालीचं लक्ष दिलं आहे. त्यामुळे आजही त्या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात.

 १९९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे (ashvini bhave). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अश्विनी यांनी मराठीसह बॉलिवूडवरही राज्य केलं. त्यामुळे आज हिंदी इंडस्ट्रीमध्येही त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिलेल्या अश्विनी भावे यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, त्यांचा फिटनेस २५ वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो कमालीचा व्हायरल होत आहे.

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अश्विनी यांनी त्यांच्या फिटनेसवर कमालीचं लक्ष दिलं आहे. त्यामुळे आजही त्या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. अश्विनी सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्या कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात येत असतात.

अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या कमालीच्या ग्लॅमरस दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :अश्विनी भावेसेलिब्रिटीसिनेमाअमेरिकाटेलिव्हिजन