Join us

"आपल्याकडे 'नाही' म्हणण्याचा पर्याय..." कास्टिंग काऊचवर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 10:41 AM

काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखाद्या गोष्टीसाठीची अट म्हणून वापर करून घेतात.

आजकाल कोणतंही क्षेत्र म्हणलं की कास्टिंग काऊचचा मुद्दा हा येतोच. त्यातच मनोरंजनसृष्टीत ते प्रकर्षाने जाणवतं. अशावेळी तुम्ही 'नाही' म्हणणं खूप गरजेचं असतं असं मत मराठी अभिनेत्री दीप्ती देवीने (Deepti Devi) मांडलं आहे. दीप्ती नुकतीच नागराज मंजुळे यांच्या 'घर बंदुक बिरयानी'मध्ये दिसली. एका मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचवर भाष्य केलं.

चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचवर अभिनेत्री दीप्ती देवी म्हणते, "हे प्रकार सगळीकडेच चालतात. कोणतंच क्षेत्र त्याला अपवाद नाही. काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखाद्या गोष्टीसाठीची अट म्हणून वापर करून घेतात. प्रत्येकाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जेव्हा हे प्रकार वाढायला लागतात तेव्हा निश्चितच त्याचा त्रास होतो. पण आपल्याकडे कधीही ठामपणे ‘नाही’ म्हणण्याचा पर्याय असतो. सगळ्यांनी ठरवलं, की हे होऊ द्यायचं नाही, तर या पात्रतेवर कुणी कास्टिंग करणार नाही. इथं नाही म्हणायची ताकद असेल, तर ती वापरायला हवी आणि मुळात असं सगळ्यांना वाटायला हवं."

दीप्तीने मालिका असो किंवा चित्रपट विविध भूमिकांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. ‘नाळ’, ‘घर बंदूक बिरयानी’ या अलीकडच्या चित्रपटांतल्या दीप्तीच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यापूर्वी ती ‘कंडिशन्स अप्लाय ः अटी लागू’, ‘पेज ४’, ‘अंतरपाट’, ‘परिवार: कर्तव्य की परीक्षा’, ‘इंदोरी इश्क’, ‘अपने अपने रिश्तों की बोली’ अशा  मालिकांमध्ये झळकली.

टॅग्स :दीप्ती देवीमराठी अभिनेताकास्टिंग काऊचमराठी चित्रपट