Join us  

'नवरा माझा नवसाचा २' सिनेमात 'ही' अभिनेत्री झळकणार, डबिंगचा व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:37 PM

'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमात झळकणाऱ्या अभिनेत्रीचा डबिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.

तब्बल १९ वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत दणदणीत यश मिळवलेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.  हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो. 'नवरा माझा नवसाचा २' ची काही दिवसांपुर्वीच घोषणा झाली होती. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच आता 'नवरा माझा नवसाचा २' सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार? याचा खुलासा झाला आहे. 

'नवरा माझा नवसाचा' सिनेमात अभिनेते सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ यांच्या अभिनयाने धमाल उडवून दिली होती. आता दुसऱ्या पार्टमध्ये कोण-कोण झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमात झळकणाऱ्या अभिनेत्रीचा डबिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी कलाविश्वातील अभिनेत्री हेमल इंगळे ही 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने स्टुडिओमधील डबिंगचा एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'काय मग? किती उत्सुक आहात NMN2 साठी ?'.  हेमलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिला चित्रपट कधी प्रदर्शित होणार, अशी विचारणा केली आहे. 

'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. पहिल्या चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट असतील याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे.  

टॅग्स :मराठी चित्रपटसेलिब्रिटीसचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकरसोशल मीडियास्वप्निल जोशी