Join us

Hemangi Kavi : “आम्ही आई-बाबाची प्रायव्हसी पाहिली आहे...”, हेमांगी कवी बिनधास्त बोलली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:27 PM

Hemangi Kavi-Dhumal:  हेमांगीने दोन वर्षानंतर सांगितलं ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्ट लिहिण्यामागचं खरं कारण

बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागणं यामुळे चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडिया पोस्टमुळे ती ट्रोलही होते.  हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट तुम्हाला आठवत असेलच. तिची ही चांगलीच व्हायरल झाली होती. आता २ वर्षानंतर ही पोस्ट टाकण्यामागचं खरं कारण हेमांगीने सांगितलं आहे.

हेमांगीने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील एका पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. यावेळी ती अगदी स्वभावाप्रमाणे परखड बोलली. ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट का टाकली, त्यामागे नेमकं कारण काय होतं? याचं उत्तरंही तिने दिलं.

 म्हणून ती पोस्ट टाकली होती..हेमांगीने सांगितलं, “मी एक व्हिडीओ टाकला होता, ज्यात मी चपात्या करत होते. त्या व्हिडीओवर एका बाईने कमेंट केली होती. ‘बाई तुला कळत नाही का, की तू पोळ्या लाटतेस…ते दिसतंय वगैरे…’ अशी तिची कमेंट होती. त्यावर  ‘तू स्वत: एक बाई आहेस, तुला स्वत:ला या गोष्टींचा त्रास होतो आणि तू मला अक्कल शिकवतेस,’ असं उत्तर मी दिलं होतं. त्यावर त्या बाईने ‘तुला पोस्ट करायच्या आधी ते कळायला हवं...वगैरे...वगैरे...’ असं बरंच काही मला सुनावलं होतं. जेव्हा एखादा पुरुष व्हाईट टी शर्टमध्ये ओला झाला तर तो बघतो का की माझं काही दिसतंय का, तो पोस्ट करुन मोकळा होतो ना…, असा प्रश्न मी केल्यावर, तो पुरुष आहे...असं त्या बाईचं उत्तरं हाेतं. मुद्दा हाच होता. आपण मुलांच्या, पुरूषांच्या सर्व गोष्टींवर दुर्लक्ष करतो, मग मुलींच्या गोष्टींकडे असं दुर्लक्ष का केलं जात नाही.  मला या गोष्टी जाणवल्या. पुरुष हा संस्कृतीकारक आहे, बायका या संस्कृती वाहक आहेत. आपण पुरुषप्रधान संस्कृती असे म्हणतोय, पण मग आता फिल्टर लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही टाकताय म्हणून आम्ही गप-गुमान ऐकणार नाही. त्यामुळे मी ती पोस्ट केली होती. त्या पोस्टवर असंख्य निगेटीव्ह कमेंट्स आल्यात. पण पाॅझिटीव्ह रिॲक्शनही असंख्य होत्या...” असे हेमांगीने यावेळी म्हटले.

 घरातील प्रायव्हसी... आई-वडिलांबद्दल आणि घरातील प्रायव्हसीबद्दल या मुलाखतीत हेमांगी बोलली. ती म्हणाली, “ आमच्या घरात बराच मोकळेपणा होता. ‘टायटानिक’, ‘दयावान’ यासारखे अनेक चित्रपट आम्ही एकत्र बसून पाहिले आहेत. किसिंग सीन लागला की रिमोटची लवपालपवी वगैरे आमच्या घरात काही नव्हतं  ही जवळपास ९३-९४ काळातील गोष्ट. तेव्हा माझ्या मैत्रिणींच्या घरी हे लपवलं जातं, याचा मला पत्ताच नव्हता. माझी आई सातवी पास, ती सुद्धा गावची. माझे बाबा एलएलबी. तेव्हा सगळेच वन रुम किचन या अशा घरात राहायचे. बाबा-आईची प्रायव्हसी वैगरे हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ते पाहिलं होतं, तेव्हा मी ताईला विचारलं होतं की ‘आई-बाबा नेमकं काय करत होते?’ तेव्हा माझ्या ताईने ‘हे असंच असतं आणि या गोष्टींमुळेच आपण आलेलो आहोत. मला वाटतं, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलायला हवं...”  

टॅग्स :हेमांगी कवीमराठी अभिनेता