Join us

Hruta Durgule : इंडस्ट्रीतल्या कोणत्या गोष्टीचा राग येतो? हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:05 IST

Hruta Durgule : आताश: हृता सिनेमांत बिझी आहे आणि याचदरम्यान टीव्ही इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवर तिने थेटपण नाराजी व्यक्त केली आहे...

हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिचं छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री. दुर्वा, फुलपाखरु, मन उडू उडू झालं अशा अनेक मालिकांमधून हृता घराघरात पोहोचली. आताश: हृता सिनेमांत बिझी आहे आणि याचदरम्यान टीव्ही इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवर तिने थेटपण नाराजी व्यक्त केली आहे. हृता आणि वैभव तत्ववादीचा 'सर्किट' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच सिनेमाच्या निमित्तानं हृताने 'मित्र म्हणे' या यूट्युब चॅनलला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये हृता अगदी रोखठोक बोलली. तुला इंडस्ट्रीतल्या कोणत्या गोष्टीचा राग येतो?, असा प्रश्न तिला केला गेला. यावर हृता स्पष्टच बोलली.

टीव्ही इंडस्ट्रीतील विशेषत: मालिका विश्वातील सलग १२ ते १३ तास काम करण्याच्या पद्धतीकडे तिने लक्ष वेधलं.  ती म्हणाली, 'अलीकडे सेटवर सर्रास १३ १३ तास काम करून घेतलं जातं. खरं तर शिफ्ट १२ तासांची असते.  सकाळी ९ ची शिफ्ट असेल तर कलाकार साडेआठलाच सेटवर हजर असतो. मात्र तो अर्धा तास काऊंटच केल्या नाही. उलट ९ ते ९ शिफ्ट असेल तर सर्रास १० वाजेपर्यंत काम चालतं. इतके तास काम करूनही मालिकांच्या आगामी भागांचं बॅंकिंग केलं जात नाहीच.' 

यावरचा तिचा तिने शोधलेला उपायही तिने यावेळी सांगितला. म्हणाली 'यावर मी माझा उपाय शोधलाये. १२ तास काम करून निघायचं, असं मी ठरवलंय. अलिकडे मी जी मालिका केली त्यावेळी मी १२ तास झाले की निघून जायचे. त्यामुळे माझं नावही कदाचित बदनाम झालं असावं....'.  

‘सर्किट’ हा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मधुर भांडारकर निर्मित ‘सर्किट’ चित्रपटातून वैभव तत्ववादी व ऋता दुर्गुळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आकाश पेंढारकर यांनी ‘सर्किट’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळेमराठी अभिनेताटेलिव्हिजन