सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने दिग्दर्शक प्रतिक शाह सोबतच्या नात्याची नुकतीच जाहिर कबुली दिली होती. प्रतिक सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केल्यापासून हृता अनेकदा दोघांचे रोमॅन्टिक अंदाजातील फोटो शेअर करत असते. आता हृताने ‘आता दिवस उरले पाच’ अशी पोस्ट टाकत बॉयफ्रेन्ड प्रतिक शाह सोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
बॅकग्राऊंडला ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातील रोमॅन्टिक गाणं सुरू आहे आणि जोडपं एकमेकांत आकंठ बुडालंय, असा हा हृता व प्रतिकचा रोमॅन्टिक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
‘माझा अधिकृत खरा आणि जीवनाचा रील जोडीदार सापडला, 5 दिवस बाकी आहेत’, असे कॅप्शन देत हृताने हा व्हिडीओ शेअर केला आहे.गेल्या 10 तासांत या व्हिडीओतला १ लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे, आदिश वैद्य, प्रार्थना बेहरे आदी सेलिब्रिटींनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.
येत्या 25 डिसेंबर रोजी ऋता आणि प्रतिक साखरपुडा करणार आहेत, अशी चर्चा आहे. कदाचित या सोहळ्याला फक्त 5 दिवस उरले असल्याचे सूतोवाच हृताने या पोस्टमधून केले आहे.
हृताच्या प्रियकराचे नाव प्रतिक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी या मालिकांसाठी त्याने काम केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.हृता दुर्गळेने ‘दुर्वा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिला खºया अर्थाने ‘फुलपाखरू’ मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. सध्या हृता ‘मन उडू उडू’ मालिकेत काम करताना दिसते आहे.
या मालिकेमध्ये दीपू ची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे ऋता दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.