Join us

किशोरी गोडबोलेंचा लेकीसोबत गरबा, Video पाहून सुप्रिया पिळगांवकरांचीही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:20 IST

सध्या या मायलेकींचा व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय.

'अधुरी प्रेम कहाणी' फेम मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले (Kishori Godbole) यांनी अभिनय आणि सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडले. त्यांना सई (Sai Godbole)ही त्यांच्या इतकीच सुंदर मुलगी आहे. सई अतिशय टॅलेंटेड असून तिला फॉरेन भाषा बोलण्याची आवड आहे. तसंच तिचा आवाजही खूप गोड आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच या मराठमोळ्या मायलेकींनी गरबा खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांच्या गरब्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय.

किशोरी गोडबोले आणि लेक सई यांनी घागरा चोली अशआ पारंपारिक लुक मध्ये गरबाच्याचा व्हिडिओ शूट केला आहे. लेकीसोबत किशोरी गोडबोले यांनीही दमदार डान्स करत चाहत्यांचं मन जिंकलंय. 'मदर डॉटर' डान्स रील असं तिने कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतोय.

अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी किशोरी गोडबोलेंचं कौतुक केलं आहे. 'क्या बात है..किशोरी तू कमाल आहेस, असं वाटतंय तुझी मुलगी आरशासमोरच डान्स करत आहे' अशी खास कमेंट सुप्रिया यांनी केलीए. तर स्वप्निल जोशी, पूजा सावंत, अमृता खानविलकर, ऋतुजा देशमुख या कलाकारांनीही व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. सध्या या मायलेकींचा व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय.

किशोरी गोडबोले यांनी 'फुल थ्री धमाल', 'खबरदार', 'कोहराम','वन रुम किचन' सारख्या मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. तसंच स्वप्नील जोशीसोबतची 'अधुरी एक कहाणी' ही मालिका प्रचंड गाजली.

टॅग्स :किशोरी गोडबोलेनृत्यमराठी अभिनेतागरबा