Join us

'गॉगल लावून चुलीवर स्वयंपाक?'; किशोरी शहाणे झाल्या ट्रोल, दिलं हटके उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 18:59 IST

Kishori Shahane: किशोरी शहाणे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

किशोरी शहाणे (kishori shahane) हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये किशोरी शहाणे झळकल्या आहेत. उत्तम अभिनय कौशल्य आणि कामाप्रतीचं प्रेम यामुळे आजही किशोरी शहाणे कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपट, मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत. सध्या किशोरी त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत.

किशोरी शहाणे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही पोस्ट करत असतात. यावेळी त्यांनी चुलीवर स्वयंपाक करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

किशोरी शहाणे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या चुलीवर मासे आणि नाचणीची भाकरी करताना दिसत आहेत. परंतु, चुलीवर स्वयंपाक करत असताना त्यांनी गॉगल लावला होता. ज्यामुळे लोकांनी त्यांनी ट्रोल केलं. 'गॉगल लावून स्वयंपाक कोण करत?' असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, 'डोळ्यात धूर जातो म्हणून नवीन आयडिया का?' असा प्रश्नही एका युजरने विचारला आहे. लोकांच्या या कमेंट वाचून किशोरी यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं.

लोकांचं ट्रोलिंग वाचल्यानंतर किशोरी यांनी आगपाखड न करता हे ट्रोलिंग अत्यंत मजेशीर पद्धतीने घेतलं. त्यांनीही या ट्रोलर्सला स्माइली इमोजी पाठवत त्यांच्या ट्रोलिंगवर मस्करी केली. त्यांचा हा अंदाज नेटकऱ्यांना आवडला आहे. 'गॉगल लावून चुलीवर स्वयंपाक', असा खोचक प्रश्न विचारणाऱ्या युजरला कमेंट करत त्यांनी स्माइली इमोजी पोस्ट केल्या आहेत. 

टॅग्स :किशोरी शहाणेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन