मराठी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका अशा सगळ्याच भूमिका पार पडणारी क्रांती रेडकर(Kranti Redkar) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मध्यंतरी आर्यन खान प्रकरणात वादात सापडले होते. त्यावेळी क्रांती त्यांच्यामागे ठामपणे उभी राहिली होती. क्रांतीला जुळ्या मुली आहेत. मात्र आजपर्यंत तिने दोन्ही मुलींचा चेहरा दाखवलेला नाही. यावरुन एका चाहतीने तिला कमेंट केली तर क्रांतीने चाहतीला रोखठोक उत्तर दिलं आहे.
क्रांतीने २०१८ मध्ये जु्ळ्या मुलींना जन्म दिला. दोघींची घरी काय मस्ती सुरु असते हे क्रांती अनेकदा व्हिडिओतून सांगत असते. नुकतंच क्रांतीच्या घरी कन्या पूजन पार पडले. यामध्ये दोन्ही मुली सुद्धा अगदी हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. याचा व्हिडिओ क्रांतीने शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा चेहरा मात्र दिसत नाही.
एका चाहतीने कमेंट करत लिहिले, 'मॅडम तुम्ही स्वतःच्या मुलींचे चेहरे दाखवले नाही आणि इतर मुलींचे व्हिडीओ काढून त्यांचे चेहरे दाखवताय तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. पूर्ण व्हिडिओ मध्ये स्वतःच्या मुलींचे बॅकसाईडने व्हिडिओ घेतला शोभत नाही तुम्हाला.'
यावर क्रांती म्हणाली, 'आईवडीलच काढत होते व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी काळजी नसावी. आणि छबिल गोदोच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही घेता का. एवढ्या धमक्या येत असताना. तर मी दाखवते चेहरे. निदान व्हिडिओची भावना तरी समजून घ्या. सारखं आपलं तत्वज्ञान झाडू नये. सतत निगेटिव्ह होऊ नका'
2020 मध्ये आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप लावले गेले. तेव्हापासून क्रांतीने मुलींचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. त्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून तिने नेहमीच खबरदारी घेतली.