Join us

अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात, जाहिरपणे कबुली देत म्हणाली - 'खूप छान असतं प्रेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:21 IST

मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही पुन्हा चर्चेत आली आहे.

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या तिच्या घटस्फोटाच्या विवादावरून चर्चेत आहे. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मानसीने तिचा प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला आहे.  घटस्फोटानंतर पुन्हा एकदा मानसीच्या आयुष्यात प्रेम आलं आहे. नुकतेच मानसीनं आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

मानसी नाईकनं नुकतेच अमृता फिल्मसला मुलाखत दिली. यावेळी तिनं करिअर आणि तिच्या खाजगी आयुष्यावर मोकळेपणाने भाष्य केलं. यावेळी ती म्हणाली, 'आता अट्टहासाने पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. तोही प्रवास आता स्त्री म्हणून जगायचा आहे. हा जो काही माझा जन्म आहे. तो मी कदापी वाया घालवणार नाही. हे मी मात्र माझ्या मनाशी घट्ट केलं आहे. कोण म्हणत अडचणी येत नाहीत. त्यांना हाय हॅलो आणि बाय करायचं असतं'. पुढे तिला प्रेम म्हणजे काय असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, खूप छान असतं प्रेम. माझ्यासाठी प्रेम खूप म्हत्त्वाचं आहे. जगात अशा खूप गोष्टी आहेत, ज्यावर तुम्ही प्रेम करु शकता. मी स्व:ताच्याच प्रेमात पडली आहे, असेही ती म्हणाली.

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असायचे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांच्याही नात्यात दुरावा आला. वाद झाल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता पुन्हा मानसी प्रेमात पडली आहे का, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

मानसी नाईकने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे तिलाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तसेच मानसीचे 'आयटम साँग' हिट ठरलेत. 'बाई वाड्यावर या', मस्त चाललंल आमचं' या गाण्यांमुळे मानसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.  सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.  

टॅग्स :मानसी नाईकसेलिब्रिटीमराठी अभिनेता