Join us

मानसी नाईकवर 'जमाल कुडु'चा फिव्हर, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 15:31 IST

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकलाही 'जमाल कुडु' गाण्याची भुरळ पडली आहे. 

'ॲनिमल' या बॉलिवूड सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमातील गाणी आणि डायलॉगही प्रचंड व्हायरल झाले आहेत.  सध्या या सिनेमातील जमाल कुडु गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या गाण्याची प्रचंड क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 'ॲनिमल' सिनेमातील बॉबी देओलच्या या गाण्यावरील अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही 'जमाल कुडु' गाण्यावरील व्हिडिओवर रील बनवले आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 

मनासी नाईक ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मानसीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा मानसी फोटोंबरोबरच डान्सचे रील व्हिडिओही शेअर करताना दिसते. मानसीवर 'जमाल कुडु' गाण्याचा फिव्हर चढला आहे. या गाण्यावरील रील व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मानसी बॉबी देओलप्रमाणे डोक्यावर कॉफीचा कप घेऊन नाचताना दिसत आहे. 

'जमाल कुडु' गाण्यावरील मानसीच्या या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "वाह...जमाल कुडु" अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका नेटकऱ्याने "क्वीन इज बॅक" असं म्हटलं आहे. मानसीचा हा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

मानसी नाईक ही उत्तम डान्सर आहे. बघतोय रिक्षावाला या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मानसीच्या अनेक गाण्यांना लोकप्रियता मिळाली. अनेक चित्रपटांमध्येही मानसी झळकली आहे.  

टॅग्स :मानसी नाईकसिनेमासेलिब्रिटी