Join us

"तुझा नवरा कुठे आहे?" चाहत्याच्या प्रश्नाला मानसी नाईकने दिलं उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:11 IST

मानसी नाईकने इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला दिलं उत्तर, म्हणाली...

'वाट बघतोय रिक्षावाला' गाण्यातून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मानसी नाईक कलाविश्वातील तिच्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. काही महिन्यांपूर्वी मानसीने पतीपासून वेगळं होत घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून मानसीच्या वैवाहिक जीवनाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच मानसीने इन्स्टाग्रामवर लाइ्व्ह सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नाला मानसीने उत्तर दिलं आहे. 

मानसीच्या लाइव्ह सेशनमध्ये चाहत्याने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत प्रश्न विचारला होता. "मानसी, तुझा नवरा कुठे आहे?" असा प्रश्न मानसीला चाहत्याने विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाला अभिनेत्रीने लाइव्ह सेशनमध्येच उत्तर दिलं होतं. "मला नवरा नाही. मी सध्या सिंगल आहे आणि मिंगल(रिलेशनशिपसाठी) होण्यासाठी तयार आहे. मी आता सिंगल आहे आणि पुन्हा हा प्रश्न मला विचारू नका," असं उत्तर मानसीने दिलं. 

"२०१६ मध्ये मालिका संपली पण...", 'का रे दुरावा'च्या आठवणीत सुयश टिळकची भावुक पोस्ट

मानसीने प्रदीप खरेराशी १९ जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. परंतु, लग्नानंतर त्यांच्यात खटके उडाल्याने घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. 

'बाईपण भारी देवा' फेम अभिनेत्रीची 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

'गुलाबी नोट', 'बाई वाड्यावर या', 'मस्त चाललंय आमचं' या गाण्यांमुळे मानसीला लोकप्रियता मिळाली. मानसीने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. नव्या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :मानसी नाईकमराठी अभिनेतामराठी चित्रपट