Join us

'मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं'; मानसीने केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 17:20 IST

Mansi naik: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मानसी नाईकने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिने अलिकडेच तिच्या हक्काचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मानसी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत होती. मात्र, घडून गेलेल्या गोष्टी विसरुन तिने तिच्या पुढील वाटचालीला सुरुवात केली आहे. यात नवीन घर खरेदी केल्यानंतर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नव्या घरात स्वयंपाक करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मानसी नाईकने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पुजेसाठी नैवेद्य तयार करताना दिसत आहे.  तिने तिच्या हाताने पुऱ्या केल्या असून पुजेसाठी पंचामृतदेखील तयार केलं. सोबतच तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे. "मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं कधी कधी मुली तुमच्या kade बघून पण हसतात", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, मध्यंतरी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी (Pradip Kharera) लग्न केलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. परंतु, आता मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेली असून तिने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. काल अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर मानसीने नवीन घरात प्रवेश केला. 

टॅग्स :मानसी नाईकबॉलिवूडसेलिब्रिटी