Join us

Mayuri Deshmukh : अगं मयुरे नवरा जाऊन..., ट्रोल करणाऱ्याला मयुरी देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:31 IST

Mayuri Deshmukh : सध्या मयुरी परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय. हॉलिडेचे काही फोटो मयुरीने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण काही जणांनी हे फोटो पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली....

‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखनं ( Mayuri Deshmukh) फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. सिनेमा, नाटक, मालिका अशी यशाची एक एक पायरी चढत असताना तिच्या आयुष्यात एक धक्कादायक वळणं आलं आणि ती अक्षरश: हादरली. जुलै 2020 मध्ये तिचा पती व अभिनेता आशुतोष भाकरे याने नैराश्यातून आत्महत्या केली. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरायला मयुरीला बराच वेळ लागला. पण कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने हळूहळू ती यातून सावरली. पुन्हा कामात रमली. स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेतून नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस आली. सध्या मयुरी परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय. हॉलिडेचे काही फोटो मयुरीने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण काही जणांनी हे फोटो पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली. एका ट्रोलरने तर थेट मयुरीला तिच्या पतीच्या निधनावरून डिवचलं. या ट्रोलरला मयुरीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

 ‘अगं मयुरे नवरा स्वर्गवास होऊन एक वर्ष सुद्धा नाही झालं आणि तू फिरायला लागलीस. फोटो काढायला लागलीस.. एन्जॉय करायला लागलीस...,’अशी कमेंट करत एका युजरने मयुरीला ट्रोल केलं. या ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत मयुरीने त्याला खरमरीत उत्तर दिलं आहे.‘समोरच्या व्यक्तिला अजिबात जज न करता त्याला हवं तसं जगू दिलं तर हे जग किती सुंदर होईल... स्वत:चा आनंद शोधणं चुकीचं नाही,’असं तिने म्हटलंय.

अभिनेत्री मयुरी देशमुखने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली.   ३१ दिवस आणि  डॉ. प्रकाश बाबा आमट  या चित्रपटात मयुरीने काम केल्‘ं आहे. तसेच  डिअर आजो,  तिसरे बादशाह हम  या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.

टॅग्स :मयुरी देशमुखमराठी अभिनेता