Join us

NEW LOOK : ‘कर्ली गर्ल’ मिथिला पालकर इतकी बदलली, नव्या लुकमध्ये ओळखणंही झालं कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 2:05 PM

Mithila Palkar New Look : होय, सध्या मिथिला पालकरला ओळखणंही अवघड झालंय. मिथिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar New Look : मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर(Mithila Palkar) म्हटलं की, सर्वप्रथम तिचे कुरळे केस डोळ्यांपुढे येतात. कुरळे केस जणू हीच तिची ओळख. अनेकजण तिला कर्ली गर्ल म्हणूनही ओळखतात. पण सध्या या कर्ली गर्लला ओळखणंही अवघड झालंय. होय, तिचा लुक पुरता बदलला आहे. मिथिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून हीच मिथिला यावर क्षणभर विश्वास बसत नाही.

मिथिलाने एका कपड्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे. या फोटोत तिचा लुक एकदम वेगळा दिसतोय. पिवळ्या, नियॉन ग्रीन रंगाच्या लहंग्यामध्ये तिने एकापेक्षा एक क्लासी पोझ दिल्या आहेत. काही साडीतील फोटोही शेअर केले आहेत. 

मिथिलाचा हा नवा लुक काहींना आवडला आहे तर काहींना मात्र तिच्या कुरळ्या केसांमधील लुक मिस केला आहे. ‘हा लुक चांगला आहे. पण तुला कुरळे केसच जास्त शोभून दिसतात,’अशा प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिल्या आहेत.

इंटरनेटमुळे मिथिलाला मिळाली होती ओळखमिथिलाने कॉलेज प्रोजेक्टसाठी स्वत:चं एक युट्यूब चॅनल काढलं होतं. एकदिवस मिथिलाने युट्यूबवर संगीताचे काही बेसिक रिदम पॅटर्न शिकून त्याला अनुसरून एक कप साँग तयार केलं. त्याचा  व्हिडिओ तिने स्वत:च्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ प्रचंड गाजला होता.  या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. बॉलिवूडच्या काही लोकांनी सुद्धा तिच्या या व्हिडिओला दाद दिली होती. परेश रावल, इम्तियाज अली, स्वानंद किरकिरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता.

मिथिलाने 2014 ला  माझं हनिमून  नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये पहिल्यांदा काम केलं. ही फिल्म 16व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली.  जून 2014 मध्ये तिला कट्टी बट्टी हा सिनेमा मिळाला. 

नंतर मिथिलानं वेब सीरिज, मराठी, हिंदी सिनेमांत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मुरांबा या सिनेमामुळे ती सर्वांच्याच डोळ्यांत भरली.  कारवाँ  या हिंदी सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. लिटिल थिंग्ज  या या सीरिजनंही तिला एक वेगळी ओळख निर्माण दिली. अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली.

टॅग्स :मिथिला पालकर