मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) ही आता कुलकर्ण्यांची सून आहे. होय, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी यांनी काहीच महिन्यांआधी लग्नगाठ बांधली. आज शिवानी लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस साजरा करतेय आणि यामुळे कुलकर्ण्यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आहे. लाडक्या सुनेचं कौतुक करण्यात सगळेच दंग आहेत. अगदी सासूबाईंनी सुद्धा आपल्या लाडक्या सूनबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
होय, मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी शिवानीच्या वाढदिवसानिमित्त एक स्पशेल पोस्ट लिहिली आहे. शिवानी सासूबाईंची किती लाडकी आहे, हे या पोस्टवरून तुम्हालाही कळेल.
शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘शेजारी शेजारी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. स्टारप्रवाह वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत शिवानीने रमाबाईची भूमिका साकारली होती.शिवानी ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.