मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande). उत्तम अभिनयाच्या जोरावर मृण्मयीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे अभिनेत्री म्हणून कलाविश्वात वावरत असतानाच तिने दिग्दर्शकीय क्षेत्रातही पदार्पण केलं. मन फकीरा हा तिने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा असून कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करत असतानाच तिने मुंबई-पुण्यासारखी महत्वाची शहरं सोडून थेट महाबळेश्वरला स्थायिक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मृण्मयी धकाधकीचं जीवन सोडून छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात राहात आहे. महाबळेश्वरमध्ये मृण्मयीने तिचं छान घर बांधलं असून घरापुढेच तिने शेतमळाही पिकवला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मृण्मयीने तिची छोटीशी शेती करायला सुरुवात केली आहे. मृण्मयी तिच्या शेतीविषयी बरेच अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे.
मृण्मयीने तिच्या शेतात वांगी, कोथिंबीर, भेंडी,मिरच्या आणि स्ट्रॉबेरी अशा भाज्या, फळ यांची शेती केली आहे. यात अलिकडेच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शेतात छत्री घेऊन उभी आहे आणि तिच्या हातात एक टोपली आहे. या टोपलीमध्ये तिच्या शेतात उगवलेली कोथिंबीर दिसून येत आहे.
दारापुढे शेती अन् लाकडी बांधकाम; मृण्मयी देशपांडेच्या महाबळेश्वरमधील घराची Inside झलक
दरम्यान, मृण्मयीने अत्यंत पारंपरिक पद्धतीने तिचं घर सजवलं आहे. या घराला तिने गावतील घराचा टच दिला आहे. तसंच तिच्या घरात लाकडी वस्तू आणि लाकडी सामानांवर जास्त भर दिला आहे. तसंच हे घर तिने तिच्या पद्धतीने डेकोरेट केल्याचं दिसून येत आहे.