Mukta Barve starrer Y marathi movie : अजीत सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘Y’ हा चित्रपट उद्या 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) ‘वाय’चं पहिलं पोस्टर शेअर केलं तेव्हापासून या चित्रपटाच्या नावाबद्दल आणि एकूणच चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. ‘वाय’ हा एक थरारपट आहे. मराठीतील पहिला हायपरलिंक सिनेमा म्हणूनही त्याची चर्चा आहे. ‘वाय’ची नेमकी कथा काय? हे उद्या प्रेक्षकांना कळेलच. पण त्याआधी हा थरारपट कसा शूट झाला, हे समोर आलंय.
होय, मुक्ता बर्वेनं चित्रपटाचे दोन मेकिंग व्हिडीओ शेअर केले आहेत. ‘असे शूट झालेत वायचे चित्तथरारक सीन्स... पाहा जबरदस्त मेकिंग,’ असं लिहित तिने पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. ‘दुसऱ्या व्हिडीओत हॉस्पिटलमध्ये चित्रीत करण्यात अलेल्या काही क्षणांची झलक पाहायला मिळते आहे.
‘वाय’चं उत्कंठावर्धक प्रमोशन, त्याचे थरारक टीझर आणि दमदार ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलचं कुतूहल वाढलं आहे. मुक्तासोबत प्राजक्ता माळी, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले आदी कलाकार या सिनेमात आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आशुतोष म्हणजे ही भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धनही या चित्रपटात आहे.
मुक्ता बर्वे या चित्रपटात एका शासकीय अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत.या घटनांचा शोध मुक्ता यात घेताना दिलतेय. दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी या धक्कादायक घटना घडतात. या घटनांमागचे कारण, करते करविते यांचा शोध मुक्ता घेताना दिसणार आहे.