ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:33 AM2019-01-23T10:33:17+5:302019-01-23T10:33:54+5:30

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या विनोदी अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

Marathi actress Namrata Awate Sambherao will soon be the mother, recently completed Baby Shower, See Photos | ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos

ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos

googlenewsNext

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या विनोदी अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे नम्रता आवटे संभेराव.

 

 नुकतंच तिच्या घरी एक कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिला मराठी चित्रपटसृष्टीतल्या मित्रमैत्रिणींनी सरप्राईज देत डोहाळे जेवण म्हणजेच बेबी शॉवर सेलिब्रेट केला. 


हे डोहाळे जेवण सध्याच्या वेस्टर्न स्टाईलने साजरा केल्याचे फोटोवरून दिसते आहे. तिला मित्रमैत्रिणींनी सरप्राईज दिल्याचे नम्रता सांगते. ती पुढे म्हणाली की, मला आणि माझा नवरा योगेश संभेराव आमच्या दोघांसाठी हे सरप्राईज होते.

 

यावेळी श्रेया बुगडे, हर्षदा खानविलकर, तेजस्विनी पंडित. सुयश टिळक, सुप्रिया पाठारे, आनंद प्रभू, धैर्यशील घोलप, ज्योती चांदेकर, पूजा पवार, ज्योती पाटील, प्रसाद जावडे, खुशबू तावडे व मृणाल देशपांडे यांनी नम्रताला सरप्राईज देत तिचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात साजरे केले. 


 

नम्रताने विविध रिएलिटी शोमध्ये आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे.

नम्रताने व्हेंटिलेटर चित्रपटात साकारलेल्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 

नम्रता लवकरच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देणार असून तिचे चाहते याची वाट पाहत आहेत.

Web Title: Marathi actress Namrata Awate Sambherao will soon be the mother, recently completed Baby Shower, See Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.