Join us

"उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..." प्रसाद खांडेकरसाठी 'लॉली'ची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 11:31 AM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रियदर्शिनी इंदलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, गौरव मोरे, शिवानी परब असे सर्वच कलाकार हास्यत्रेसोबतच नाटक, सिनेमातही काम करत आहेत. तर सर्वांचा लाडका प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शनात उतरलाय. त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच सिनेमा 'एकदा येऊन तर बघा' लवकरच रिलीज होतोय. यानिमित्त नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) प्रसादसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

नम्रताने लिहिले,'फाल्गुन अश्विनी. उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस. तू दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय. तुझं अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होतंय. तुला खूप शुभेच्छा पश्या.'

ती पुढे लिहिते,'कमाल झालाय सिनेमा.पहिला चित्रपट जर असा असेल तर इथून पुढचे सगळे चित्रपट तू असेच यशस्वीरीत्या दिग्दर्शित करशील ह्याची खात्री आहे मला. त्याची मी साक्षीदार आहे ह्याचा अतोनात आनंद होतोय. असंच passionately काम करत रहा, तुझ्यातली सकारात्मक ऊर्जा खूप शिकवून जाते नेहमीच. असाच रहा खूप मोठा हो. चित्रपट दिग्दर्शकांच्या फळीत आता तुझंही नाव लागणार. खूप अभिमान वाटतोय तुझा तुला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पश्या.  ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला नक्की जा लवकर तिकिट्स बुक करा आणि एक धमाल laughter ride अनुभवा'

नम्रताने प्रसाद खांडेकरचं कौतुक करत ही पोस्ट शेअर केली आहे. प्रसाद आणि नम्रता दोघंही सिनेमात कलाकार म्हणूनही आहेत.  तसंच गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, वनिता खरात, पॅडी, भाऊ कदम, रोहित माने ही मंडळीही सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामराठी चित्रपट