आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. आपले आवडते कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत, त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला लोकांना आवडते. कलाकार देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असतात.
निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी त्यांची गणना केली जात असे. त्या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक लेखिका देखील आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्या काही वर्षांपूर्वी ससुराम सिमर का, सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या हिंदी मालिकांमध्ये देखील झळकल्या होत्या.
निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. त्यांचे लग्न एका अभिनेत्यासोबत झाले असून त्यांच्या पतीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच स्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेल्या श्री गुरुदेव दत्त या मालिकेचे ते आणि निशिगंधा वाड निर्माते असून ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. निशिगंधा यांच्या पतीचे नाव दीपक देऊळकर असून कृष्णा या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बलरामाची भूमिका साकारली होती. त्यांनी लेक लाडकी या घरची, सपने साजन के, लेक लाडकी या घरची यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
प्रसिद्ध लेखिका विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई असून त्यांची अनेक पुस्तकं गाजली आहेत. निशिगंधा आणि दीपक यांना मुलगी असून तिचे नाव इश्वरी आहे.