Nivedita Saraf Post for son Aniket Saraf : अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf ) आणि अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आपल्या एकुलत्या एक मुलावर जीव ओवाळतात. निवेदिता यांच्यासाठी तर तो अगदी जीव की प्राण आहे. अशोक सराफ व निवेदिता यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव अनिकेत आहे. आईवडिल अभिनय क्षेत्रात असताना अनिकेतनं वेगळी वाट निवडली. तो एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये रमला. तो एक शेफ आहे. तो परदेशात असतो. काल तो पुन्हा परदेशी परतला. आई-बाबा त्याला निरोप द्यायला विमानतळावर आलेत. यावेळी आईची अवस्था काय होणार? लेकाला बाय म्हणताना ती प्रचंड भावुक झाली.
निवेदिता यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांच्या मनाची अवस्था दिसते. ‘आपल्या मुलाला बाय म्हणणं हे प्रत्येक आईसाठी जगातील सर्वाधिक अवघड गोष्ट असते,’असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अशोक सराफ यांचा नुकताच वाढदिवास झाला. बाबाच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत भारतात आला होता. वाढदिवस झाल्यानंतर तो परत परदेशात निघाला असताना निवेदित आणि अशोक सराफ त्याला विमानतळावर सोडायला गेलेत. त्याचा एक फोटो निवेदिता सराफ यांनी पोस्टसोबत शेअर केला आहे. अनिकेतला बालपणी आई निवेदिता यांना स्वयंपाक करताना बघायचा. आईला बघून त्याला देखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचं ठरवलं.
अनिकेतचं शिक्षण फ्रान्समध्ये झालं आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचं उत्कृष्ट जेवण बनवतो. एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी देखील सांगितलं होतं. मुलानं अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावं, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझं ते स्वप्नं पूर्ण केलं आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.युट्युबवर ‘निक सराफ’ या नावानं अनिकेतचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.वडील अशोक सराफ यांना अनिकेतच्या हातच्या ब्राऊनी खूप आवडते. तर आई निवेदिताला अनिकेतने बनवलेला मार्बल केक आवडतो.