Join us

mamaearth आणि अशोक मामांचं आहे खास कनेक्शन?; निवेदिता सराफ यांनी शेअर केला भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:16 IST

nivedita saraf: निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे निवेदिता सराफ (nivedita saraf) आणि अशोक सराफ (ashok saraf). या जोडीने आजवर अनेक गाजलेले सिनेमा मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे त्यांची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. अशोक सराफ यांचा कलाविश्वातला वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, निवेदिता सराफ यांचा कलाविश्वात आणि सोशल मीडिया या दोन्ही ठिकाणी चांगला वावर असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्या कायम इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे.

अशोक सराफ यांना आज सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मामा याच नावाने बोलावलं जातं. इतकंच नाही तर चाहते सुद्धा काही वेळा त्यांना मामा म्हणूनच प्रेमाने हाक देतात. विशेष निवेदिता सराफ यांनी याच मामा शब्दाचा वापर करुन अशोक सराफ यांचा एक भन्नाट फोटो शेअर केला आहे.

निवेदिता सराफ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ मामाअर्थ या ब्रँडच्या दुकानाबाहेर उभे आहेत. सोबतच 'See what I captured' असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो क्लिक केल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी  अशोक मामा यांना बरोबर मामाअर्थ या नावामधील मामा याच शब्दाखाली उभं केल्यामुळे अनेकांना हसू अनावर झालं आहे. त्यांच्याया पोस्टवर नेटकऱ्यांसोबत सेलिब्रिटींनीह कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफसेलिब्रिटीमराठी अभिनेता