Join us

लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'कलरफूल'ने बनवला रील, पूजा सावंतचा व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 1:37 PM

मराठमोळ्या पूजा सावंतला 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ पडली आहे. जाने गुलाबी साडी नेसून 'गुलाबी साडी' गाण्यावर रील बनवला आहे.

काही केल्या गुलाबी साडी गाण्याची क्रेझ कमी होत नाहीये.गेल्या कित्येक दिवसांपासून हे मराठमोळं गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. माधुरी दीक्षितपासून ते रेमो डिसुझापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसले. आता मराठमोळ्या पूजा सावंतला गुलाबी साडी गाण्याची भुरळ पडली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री अशी ओळख मिळवलेली पूजा सावंत अनेकांची क्रश आहे. अभिनयाबरोबरच पूजा तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्यामुळे ओळखली जाते. नुकतंच पूजाने गुलाबी साडी या ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. पूजाने गुलाबी साडी नेसून गुलाबी साडीवर रील बनवला आहे. इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ पूजाने शेअर केला आहे. 

या व्हिडिओत पूजाने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. कानात झुमके आणि नाकात नथ घालून पारंपरिक पद्धतीने पूजा नटली आहे. केसांत गजरा माळल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. पूजाने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. "गुलाबी साडी नेसून दुसऱ्या गाण्यावर रील बनवला तर ते चुकीचं होईल", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. पूजाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पूजाने 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'भेटली तू पुन्हा', 'दगडी चाळ', 'लपाछुपी', 'निलकंठ मास्टर', 'बोनस', 'मुसाफिरा' अशा सिनेमांत तिने काम केलं आहे. पूजा बॉलिवूड सिनेमांतही झळकली आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधत पूजाने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटी