Join us  

पूजा सावंतवर दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 12:35 PM

पूजाने एक वाईट बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. पूजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

मराठी सिनेसृष्टीची कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत कायमच चर्चेत असते. अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या पूजाने सिनेसृष्टीत जम बसवला. पूजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने एक वाईट बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. पूजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  पूजाजवळ असणाऱ्या लाडक्या मांजरीचं निधन झालं आहे. 

पूजाचं प्राणीप्रेम लपून राहिलेलं नाही. याआधीही तिने अनेकदा याबाबत मुलाखतीतून भाष्य केलं आहे. पूजा जवळच्या Bella mumma या मांजरीचं निधन झालं आहे. याबाबत पूजाने भावुक पोस्ट शेअर केली आहे. "हे बरोबर नाही Bella mumma...तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता तसंच राहणार नाही. मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येईल. तू माझं आयुष्य प्रकाशित केलं होतंस. आता मला सगळीकडे अंधार दिसत आहे. मी तुला पुन्हा भेटेन. Rest in peace mumma", असं पूजाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, पूजाने 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. अनेक सिनेमांमध्ये काम केलेल्या पूजाला 'दगडी चाळ' या सिनेमाने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. मराठीबरोबरच तिने काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. पूजाने फेब्रुवारी महिन्यात सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.  

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटी