मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. अगदी रोज प्राजक्ताला सोशल मीडियावर लग्नाचे प्रपोजल येतात. पण लग्नाचं अद्यापतरी प्राजूने मनावर घेतलेलं नाही. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मात्र अजून तरी प्राजक्ताला हवा तसा जोडीदार सापडलेला नाही. प्राजूला कसा जोडीदार हवा, याबद्दलची तिची मतं अगदी स्पष्ट आहेत. होय, एका मुलाखतीत तिने मुलगा कसा हवा, याचा खुलासा केला होता.साधारण दोन वर्षांपूर्वी प्राजक्ताने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती लग्नाबद्दल बोलली होती. मी लग्न करायला तयार आहे. मात्र माझी एकच अट आहे, असं ती म्हणाली होती. आता ही अट काय तर यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.
“माझ्या कुटुंबाने माझ्या लग्नाची संपूर्ण तयारी आहे. अगदी माझ्या आईने लग्नाच्या दागिन्यांची खरेदी वगैरेही केली आहे. फक्त नवरदेव भेटणं तेवढ बाकी आहे. योग्य नवरा मुलगा मिळाला की मी लग्न करेन. हा योग्य केव्हा येईल, हे मात्र मला ठाऊक नाही. लग्नासाठी मुलगा कसा हवा, तर माझी एकच अट आहे. मला निर्व्यसनी मुलगा हवा. हीच माझी पहिली अपेक्षा आणि पहिली अट आहे,” असं प्राजक्ता म्हणाली होती.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली होती. त्यावेळी तिने श्रीश्रींना “लग्न करणं गरजेचंच आहे का?” असा प्रश्न विचारला होता. यावर “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही. आनंदी राहणं सगळ्यांत महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन आनंदी राहू शकता, तसंच लग्न न करताही आनंदी राहू शकता. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. काही एकटेपणामुळे दुःखी असतात. त्यामुळे तुम्हाला काय हवं, हे तुम्ही निवडा. आनंद हा सर्वात महत्त्वाचा,”असं श्रीश्री म्हणाले होते.