Join us

प्रिया बापटचं सुपर बोल्ड फोटोशूट, पाच तासातच लाखो लाईक्स, कमेंट्स तर विचारूच नका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:30 IST

Priya Bapat : होय, प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत सार्‍यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. 

एक गुणी, सोज्वळ आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट ( Priya Bapat).  सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. शिवाय स्वत:चे बोल्ड, ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच फोटोंची चर्चा आहे. होय, प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत सार्‍यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. 

प्रियाने नव्या फोटोशूटचे दोन फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. यात ती कमालीची ग्लॅमरस दिसतेय. निळ्या रंगाचा डेनिममध्ये तिने झक्कास पोझ दिल्या आहेत. शर्टची बटन्स काढत तिने दिलेल्या बोल्ड पोझ पाहून सगळे थक्क आहेत.  प्रियाचे या फोटोंवर चाहते फिदा झालेत. 

 साधारण पाच वर्षांची असता पासून प्रियाने अभिनयाला सुरूवात केली आहे. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ नावाच्या शाळेच्या नाटकात तिने म्हातारीची भूमिका केली होती. या भुमिकेसाठी तिला पहिलं बक्षिसही मिळालं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर वगैरे करण्याचा विचार तिच्या मनात देखील नव्हता. अभिनय म्हणजे काय हे फार कळतंही नसताना फक्त आपल्या कामाचं कौतुक होतंय, सर्वांना आवडतंय यातच आनंद मानून तिने आपला अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला.  

काकस्पर्श, टाईमपास-२,  टाईम प्लीज,  मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,  वजनदार  या मराठी चित्रपटांबरोबरच  मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवरूनही प्रियाने आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तिने अलीकडेच  मायानगरी-सिटी आॅफ ड्रीम्स  आणि  आणि काय हवं  ही वेब सिरीज केली आहे. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही प्रियाची वेबसिरीज चांगलीच गाजली होती.

टॅग्स :प्रिया बापट