Join us

Video: हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 12:17 PM

Priya bapat: सध्या सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

'काकस्पर्श', 'वजनदार', 'टाइमपास २' अशा किती तरी चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट( priya bapat). उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर प्रिया आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अनेक चित्रपटांसह प्रिया काही मालिकांमध्येही झळकली. त्यामुळे तिचा आजच्या घडीला प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफविषयीदेखील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या प्रियाचा एक वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयासह फिटनेसकडेही तितकंच लक्ष देत असतात. त्यामुळे दररोज ते वर्कआऊट, डाएट यांच्याकडे जातीने लक्ष देतात. यात प्रियादेखील न चुकता तिचा वर्कआऊट नेमाने करत असते. बऱ्याचदा प्रियाने तिच्या वर्कआऊट सेशनचे काही फोटो वा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मात्र, यावेळी तिने हेवी वर्कआऊट करत चाहत्यांना धक्का दिला आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया प्रचंड हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, कलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

दरम्यान, प्रिया मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर तिने ओटीटीवरही पदार्पण केलं आहे. 

टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजननाटक