Join us

'कमाल, कमाल आणि कमाल..!' प्रिया बापटचे सिल्व्हर ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो पाहून चाहते पडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 17:37 IST

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. प्रियाने यात सिल्व्हर रंगाचा स्कर्ट टॉप घातलेला दिसतोय. यात प्रिया खूपच ग्लॅमरस दिसतेय. फोटोंमध्ये प्रिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. प्रियाचे या फोटोंवर चाहते फिदा झालेत. कमाल कमाल आणि कमाल सुंदर, ब्युटीफुल, स्टनिंग, अग्री कन्या, गॉर्जिअस अशा कमेंट तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

साधारण पाच वर्षांची असता पासून प्रियाने अभिनयाला सुरूवात केली आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नावाच्या शाळेच्या नाटकात तिने म्हातारीची भूमिका केली होती. या भुमिकेसाठी तिला पहिलं बक्षिसही मिळालं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर वगैरे करण्याचा विचार तिच्या मनात देखील नव्हता. अभिनय म्हणजे काय हे फार कळतंही नसताना फक्त आपल्या कामाचं कौतुक होतंय, सर्वांना आवडतंय यातच आनंद मानून तिने आपला अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 

टॅग्स :प्रिया बापट