Join us

बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने स्पष्टच सांगितलं, म्हणाली- "माझ्या लग्नाला १३ वर्ष झाली आणि मूल नाही म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 3:28 PM

लग्नाला १३ वर्ष होऊनही आईबाबा झाले नसल्यामुळे अनेकदा प्रिया आणि उमेशला याबाबत प्रश्न विचारला जातो. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने उत्तर दिलं आहे. 

प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेकदा ते सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ते एकमेकांवरील प्रेमही व्यक्त करताना दिसतात. पण, लग्नाला १३ वर्ष होऊनही आईबाबा झाले नसल्यामुळे अनेकदा प्रिया आणि उमेशला याबाबत प्रश्न विचारला जातो. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने उत्तर दिलं आहे. 

प्रियाने नुकतीच अमुक तमुक या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने उमेशबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं. त्याचवेळी लग्नानंतर मूल नसण्याबाबत लोकांच्या विचारांबाबतही प्रियाने स्पष्ट मत मांडलं. ती म्हणाली, "मूल जन्माला घालण्यासाठी मी लग्न करत नाहीये. मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचंय म्हणून मी लग्न करतोय. मग ते जेव्हा येईल तेव्हा आपण बघुया, असं मला उमेश म्हणाला होता. मला या सततच्या बाळ होण्याच्या प्रश्नावर आता थकायला झालंय. प्रेम असो किंवा लोकांची अपेक्षा असो...काहीही असो पण, मला घरच्यांनी पण विचारलं नाहीये इतके वेळा लोक बाहेरून प्रश्न विचारतात. नाटकाच्या प्रयोगाला येऊन एक काकू म्हणाल्या गुडन्यूज कधी? मला सुरुवातीला अशा प्रश्नांचा राग यायचा. हा सर्वस्वी माझा, माझ्या नवऱ्याचा आणि घरच्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही मला का विचारताय? असं मला व्हायचं. मग मला हळूहळू कळलं की लोकांना उमेश आणि माझ्याबद्दल प्रचंड आत्मीयता आहे, म्हणून कदाचित ते विचारत असावेत". 

"मला असं वाटतं की लग्न झालंय आणि मूल हवंय हे प्रेशरच कुठल्याही स्त्रीवरुन आपण दूर केलं पाहिजे. माझ्या लग्नाला १३ वर्ष झालीयेत आणि मला मूल नाहीये. पण, हा माझा निर्णय आहे. उद्या मला ४२व्या वर्षी वाटलं की आता मूल जन्माला घालायचंय तर मी घालेन. जर तेव्हा मला नाही वाटलं तर मी तेव्हाही नाही घालणार. मला वाटतं आपण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. एका जोडप्याने मूल जन्माला घातलं पाहिजे, हा अलिखित नियम आहे. तोच मला मुळात पटत नाही", असंदेखील प्रियाने सांगितलं. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतसेलिब्रिटी