दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रिंकू राजगुरूला (Rinku Rajguru ) या चित्रपटानं तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सैराट’मध्ये बिनधास्त ‘आर्ची’ची भूमिका साकारणाऱ्या आणि परश्याला अगदी बेधडकणे ‘आय लव्ह यू’ बोलणाऱ्या रिंकूच्या खऱ्या आयुष्यातील ‘परश्या’बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तुम्हीही उत्सुक असाल तर रिंकूचा हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. ‘प्यार हुआ चुपके से’ असं म्हणत रिंकूने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत रिंकू ‘प्यार हुआ चुपके से’ या हिंदी गाण्यावर मस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिचा हा क्यूट अंदाज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडीओवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडतोय. सो क्यूट, नादखुळा, भारी, आमची आर्ची, सुंदर अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
‘ क्षणभर विचार थांबवा आणि आयुष्य जे देतंय, त्याचा आनंद घ्यायला शिका...’, असं कॅप्शन रिंकूने या व्हिडीओला दिलं आहे. काही दिवसांपूर्वी रिंकू आकाशसोबत डिनर डेटवर गेली होती. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात होत्या. पण असं काहीही नसल्याचं रिंकूने लगेच स्पष्ट केलं होतं. मी अद्यापही सिंगल आहे, असं चाहत्यांशी संवाद साधताना तिने स्पष्ट केलं होतं.
‘सैराट’नंतर रिंकू राजगुरू एका रात्रीत स्टार झाली. आता ही आर्ची कुठल्या कुठं पोहोचलीये. मराठी सिनेमाचं नाही तर हिंदी सिनेमा, हिंदी वेबसीरिजमधून ती इंडस्ट्री गाजवतेय. सोशल मीडियावरही तिची चांगलीच हवा आहे. सैराटनंतर मेकअप, कागर या मराठी चित्रपटात ती झळकली. १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये दिसली. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातही तिने भूमिका साकारली.