Join us

Video: 'मैं खुद को छुपाऊं कहाँ'; लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:10 IST

Rinku rajguru: रिंकूने कमी वयात यश, प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा होत असते.

सैराट या चित्रटातून कलाविश्वात पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या रिंकूने कमी वयात यश, प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा होत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तिचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला आहे. यात अलिकडेच तिने एक व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असलेल्या रिंकूने लाल रंगाच्या साडीत एक हटके फोटोशूट केलं आहे. याच साडीमध्ये तिने काही इन्स्टा रिल्सदेखील केले आहेत.  यात तिने जादू है नशा हैं या गाण्यावर शेअर केलेला व्हि़डीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये रिंकूने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहे.

दरम्यान, अलिकडेच रिंकू झुंड या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिला लूक पाहिल्यावर अनेकांनी सैराटमधील आर्चीची आठवण झाली. त्यामुळे या चित्रपटातील तिचा लूकही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 

टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमाझुंड चित्रपट