मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (rinku rajguru). उत्तम अभिनयशैलीमुळे रिंकूने फार कमी वयात लोकप्रियता मिळवली. रिंकूचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे रिंकूशी लग्न करावा किंवा तिच्यासारखी पत्नी असावी अनेक तरुणांची इच्छा असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, एका तरुणाने थेट रिंकू माझी पत्नी आहे असा दावा केला. इतकंच नाही तर रिंकूला भेटण्यासाठी तो चक्क तिचा पाठलागही करु लागला होता. नुकतंच रिंकूने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.
नुकताच रिंकूचा 'झिम्मा 2' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूने लोकमत फिल्मीच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलत असताना तिने अंगावर काटा आणणारा एका चाहत्याचा अनुभव सांगितला.'तुला कुठल्या विचित्र चाहत्याचा काही अनुभव आलाय का?' असा प्रश्न रिंकूला विचारण्यात आला होता. त्यावर रिंकूने एका चाहत्याविषयी सांगितलं. हा चाहता तिच्याशी लग्न करण्यासाठी तिचा पाठलाग करत होता. इतकंच नाही तर तिच्या घरापर्यंतही तो येऊन पोहोचला होता.
'सैराट'च्या मानधनाचं रिंकूने काय केलं?; मिळालेल्या पैशातून खरेदी केली होती 'ही' गोष्ट
"एक माणूस होता जो सातत्याने माझ्या घरी येत होता. आणि, फक्त घरी येत नव्हता तर तो सांगायचा की ही माझ्या मागच्या जन्मातली बायको आहे. तो सतत मला रुक्मिणी वगैरे अशा नावाने हाक मारायचा. त्यावेळी मी १७-१८ वर्षांची असेल", असं रिंकू म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी एका कार्यक्रमात गेले होते त्यावेळी सगळ्यांना पाहून मी हाय-हॅलो केलं. तर त्याचं म्हणणं होतं की, मी त्याच्याकडे पाहून हाय केलं आणि मी त्याच्या डोळ्यात पाहत होते. पण मला हे काहीच आठवत नाही. त्यानंतर मी ज्या इव्हेंटला जायचे तिकडे तो माणूस यायचा. घरीही यायचा आणि म्हणायचा की, ही देवीचा अवतार आहे. यात माझी रुक्मिणी मला दिसते. मागच्या जन्मात ती माझी बायको होती मग या जन्मात मला तिच्याशी लग्न करायचंय. तो सतत त्रास द्यायचा. हे खूप भितीदायक होतं."
दरम्यान, रिंकू राजगुरु आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कागर, सैराट, आठवा रंग प्रेमाचा, मेकअप, झुंड यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. इतकंच नाही तर ती वेब सीरिजमध्येही झळकली आहे.